Kavita "To Ek Skhan" Marathi Poems For Friends


This resource contain Marathi poems for friends and friendship. Marathi literature is very wonderful and having very interesting resources. Here you can read more Marathi poems for mother, father and friends.

Kavita "To Ek Skhan" Marathi Poems For Friendsतो एक क्षण - मराठी कवितातो एक क्षण म्हणजे संपूर्ण आयुय्ष,
आजही ते क्षण आठविले म्हणजे मन हरकून जाते,
त्या क्षणी घडलेल्या सर्व गोष्टी म्हणजेच जीवनाची शिदोरी वाटते,
आजही त्या क्षणात मी स्वताला शोधतो आणि कधी स्वताच पोट धरून हसतो,

तो एक क्षण म्हणजे अमृतच,
ना कोणते काम,
ना कोणाची जीम्मेद्दारी,
फक्त खेळ आणि फक्त शाळा,
बाईचा फटका आजही आठवतो,
आजही त्या क्षणात मी स्वताला शोधतो आणि कधी स्वताच पोट धरून हसतो,

तो एक क्षण म्हणजे जीवनाचा पाया,
कधी आई रागावली,
बाबांनी मारले,
सायकल नाही भेटली,
म्हणून संपूर्ण रात रडत राहलो,
आजही त्या क्षणात मी स्वताला शोधतो आणि कधी स्वताच पोट धरून हसतो,

तो एक क्षण म्हणजे सोबत्याची साथ,
पतंग उडवायची म्हणून मंझा घोटला,
कधी माझा कधी त्याचा हात माजानी काटला,
तरी पतंगाची शर्यत कधी संपली नाही,
एकाच ताटात मिळाले ते भांडून खाल्ले,
कधी अभ्यास करायचं म्हणून रात रात जगलो,
शेवटी कमी मार्क मिळाले म्हणून रडत बसलो,
आजही त्या क्षणात मी स्वताला शोधतो आणि कधी स्वताच पोट धरून हसतो,

तो एक क्षण म्हणजे पहिल्या प्रेमाचा आनंद,
ती मला पाहून हसली आणि मी फसलो,
पहिले प्रेम म्हणून गगनाला गवसणी घालत बसलो,
आज तिचा वाढदिवस म्हणून सप्रेम भेटीची दुकाने हिंडून काढली,
तिची कोणी खोड काढली म्हणून त्याला झोडपून काढले,
ती रागावली तर दिवा रात्र समजावण्यात गेले,
आजही तिचा तो प्रेमळ चेहरा आठवतो,
आजही त्या क्षणात मी स्वताला शोधतो आणि कधी स्वताच पोट धरून हसतो.

धन्यवाद माझी कविता आवडल्या बद्दल. आपण माझी कविता आपल्या मित्रांसोबत वाटू शकता त्याकरिता तुम्ही गूगल प्लस किंवा फेसबुक हे चिन्ह दाबून करू शकता. आपणास जर माझ्या कविता आवडल्या असतील तर तुम्ही या पणाला आपल्या नोंदी मध्ये ठेवा.

Subscribe us by bookmarking in your browser for reading Marathi poems on special occasions like birth day, mothers day, fathers day, friendship day, valentine day, etc.


Related Articles

More articles: May Boli Marathi Marathi Poems Marathi Kavita

Comments

No responses found. Be the first to comment...


  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: