साने गुरुजींचा जीवनपट

सन घटना
१८९९ २४ डिसेंबर रोजी गाव पालगड जि. रत्नागिरी येथे जन्म. (नाव - पंढरी - कागदोपत्री पांडुरंग सदाशिव साने)
१९१८ मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण.
१९२२ बी. ए. (द्वितीय श्रेणी) उत्तीर्ण संस्कृत व मराठी विषय) न्यू पुना कॉलेज, पुणे (सध्याचे सर पर्शुरामभाऊ कॉलेज)
१९२३ अमळनेर येथे तत्वज्ञान मंदिरात प्रवेश.
१९२४ एम. ए. (द्वितीय श्रेणी) उत्तीर्ण संस्कृत वेदांत
१९२४ ते १९३०
अमळनेर येथे प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून सेवा. साने सर पुढे 'साने गुरुजी' टोपण नाव. येथेच छात्रालयात सहवास. 'छात्रालय दैनिक' सुरु केले.
१९३० शिक्षकाच्या नौकरीचा त्याग. स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग. १७ मे १९३० रोजी पहिला तुरुंगवास. पंधरा महिने शिक्षा. धुळे तुरुंगात रवानगी. तेथून पुढील शिक्षेसाठी त्रीचनापल्लीच्या तुरुंगात. २३ मार्च १९३१ रोजी सुटका. (तुरुंगात लेखन)
१९३२ खान्देश दौरा (विनोबांसवे) पुन्हा शिक्षा. धुळ्याच्या तुरुंगात रवाना. आचार्य विनोबांसवे तुरुंगात विविध उपक्रम. गीता प्रवचने लेखनाचे कार्य. विनोबा प्रवचन द्यायचे. गुरुजी लिहून काढत असत. ऑक्टोबर १९३३ मध्ये सुटका.
१९३४-३५ खानदेशात भूमिगत कार्य. पुण्यात काही दिवस अज्ञातवास. या काळात स्त्री ओव्यांचे संकलन.
१९३६ फैजपूर कॉंग्रेस दि २७/२८ डिसेंबर १९३६ खेड्यातील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रचार, सभा सक्रीय कार्य.
१९३७ कॉंग्रेसचा प्रचार (प्रांतिक विधी मंडळ निवडणूक) फेब्रुवारी १९३७.
१९३८ 'कॉंग्रेस' साप्ताहिक सुरु केले. (६ एप्रिल १९३८)
१९३९ पूर्व खानदेशात शेतकरी जागृती २६ जानेवारी १९३९ रोजी कलेक्टर कचेरी जळगाव येथे मोर्चा आयोजित केला.
१९४० चांदवड (जि. नाशिक) युवक परिषद आक्षेपार्ह भाषणाबद्दल अटक. २७ डिसेंबर १९४० रोजी नाशिक तुरुंगात. तेथून ४ जानेवारी १९४१ रोजी धुळे तुरुंगात रवानगी. सक्तमजुरी. तुरुंगात लेखन.
१९४२ १९४२ च्या क्रांतिकारी चलेजाव आंदोलनात सहभाग. खानदेशात भूमिगत. कार्य मुंबईस गेले.
१९४३ भूमिगत असताना मुंबईस 'मूषक महल' येथे अटक. येरवडा तुरुंगात रवानगी. १५ जानेवारी १९४५ रोजी सुटका.
१९४६ अध्यक्ष पदाचा मान. कुमार साहित्य संमेलन, पुणे.
१९४७ पंढरपूर विठ्ठल मंदिर हरिजन प्रवेशासाठी आमरण उपोषण १ मे १९४७ ते १० मे १९४७ पावेतो. म. गांधीच्या आदेशानुसार चर्चा व वाटाघाटी होऊन मंदिर हरिजनांसाठी खुले करण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
१९४८ दि ३० जानेवारी १९४८ रोजी म. गांधीजींची निर्घुण हत्या. त्याचा जबरदस्त धक्का बसला. १५ ऑगस्ट १९४८ रोजी 'साधना' साप्ताहिकाची व स्थापना सुरुवात.
१९५० ११ जून १९५० रोजी पाहते ४ वाजेच्या सुमारास के. इ. एम. रुग्णालय मुंबई येथे निर्वाण