You must Sign In to post a response.
 • Category: Hockey

  India's London Olympic 2012 journey - Qualified players & their games

  प्रिय मित्रानो,

  आपल्या भारतात "क्रिकेट" या खेळाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही खेळाला फारसे महत्व दिले जात नाही. कारण बाकी इतर कुठलेही खेळ हे तितकेसे लोकप्रिय नाहीत. त्यामुळे क्रिकेट सोडून अन्य कुठलेही खेळ आवडीने बघण्याकडे कुणाचाही कल नसतो. याच कारणामुळे टी. वी. च्यानल्स देखील या खेळांकडे दुर्लक्ष करतात, अहो जर त्याचे च्यानल वर दाखविण्यात येणारे खेळ कोणी पहिलेच नाहीत तर त्यांना देखील पैसा कुठून मिळणार हो.
  या व अश्या अनेक कारणांमुळे आपल्या देशात अन्य खेळ कोणी बघत नाहीत, खेळत नाहीत. मग अश्या परिस्तिथीत कुठली कंपनी इतर खेळांना स्पोन्सार करणार ?

  या मूळेच आज आपल्या अब्जावधी लोकसंख्या असलेल्या देशातून "ऑलिम्पिक सारख्या खेळाच्या महाकुंभ मेळ्यासाठी" कमीत कमी १०० लोक सुद्धा पाठवता येत नाहीत. म्हणजे तितके खेळाडू देखील पात्र ठरत नाहीत. हि अत्यंत खेदजनक बाब आहे. बर काही खेळाडू होतात देखील पात्र , पण त्यांच्यावर खर्च करावा लागतो ना ! त्यांच्या सरावाचा, जेवणाचा, प्रवासाचा इतर बरच खर्च असतात ......... पण यासाठी देखील बरेच कमी लोक, कंपन्या तयार होतात. या अशा सर्व परिस्थितीत कसे काय आपले खेळाडू ऑलिम्पिक पदक मिळवतील ?

  ह्या सर्व गोष्टी आपण बदलू शकतो. इतर खेळान कडे देखील तितक्याच आवडीने लक्ष देवून, इतर खेळाडूना देखील तितकेच प्रोत्साहन देवून, इतर खेळ टी. व्ही. वर बघण्याने, इतर खेळाडूबद्दल बरीच माहित गोळा करण्याने या व अश्या अनेक गोष्टींपासून आपण त्यांना प्रोत्साहन देवू शकतो.

  चला तर आपल्या पासूनच सुरुवात करूया . मी आता जुलै मध्ये चालू होणाऱ्या "लंडन ऑलिम्पिक २०१२ " ची माहिती खाली तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्ही देखील हि माहिती आपल्या मित्रमैत्रीणींबरोबर शेअर करावी असे मला वाटते.

  लंडन ऑलिम्पिक साठी यावर्षी आपल्या देशातून आता पर्यंत ८१ खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे त्यांची नावे त्याच्या खेलासाहित खालीलप्रमाणे :

  आर्चरी :

  पुरुष खेळाडू
  १) जयंत तालुकदार
  २) राहुल ब्यानार्जी
  ३) तरुणदीप राय
  हे सर्व
  महिला खेळाडू :
  १) लैशाराम बोम्बायला देवी
  २) दीपिका कुमारी
  ३) चेक्रोवोलू स्वुरो

  आएथलेतिक्स :

  १) बसंत बहादूर राणा - ५० मीटर वॉक
  २) बलजिंदर सिंग - २० मीटर वॉक
  ३) गुरुमित सिंग - २० मीटर वॉक
  ४) इरफान कोलोठूम थोडी - २० मीटर वॉक
  ५) राम सिंग यादव - मेरेथोन
  ६) विकास गोवडा - थाळी फेक
  ७) ओम प्रकाश काराहाना - शोट पूत
  ८) रेनाजित महेश्वरी - तिहेरी लांब उडी
  ९) टिनू लुका - धावणे - ८०० मीटर
  १०) सुधा सिंग - अडथळा शर्यत - ३००० मीटर
  ११) सीमा अंतिल - थाळी फेक
  १२) मयूखा जॉनी - तिहेरी लांब उडी
  १३) कृष्णा पुनिया - थाळी फेक
  १४) सहाणा कुमारी - उंच उडी

  ब्याड मिन्तन ( Badminton):

  १) पुरुपल्ली कश्यप - पुरुष एकेरी
  २) साईना नेहवाल - महिला एकेरी
  ३) ज्वाला गुट्टा - महिला दुहेरी
  ४) अश्विनी पोनाप्पा - महिला दुहेरी
  ५) वी. द्विजु - महिला पुरुष दुहेरी
  ६) ज्वाला गुट्टा - महिला पुरुष दुहेरी

  बॉक्सिंग :

  पुरुष :
  १) देवेन्द्रो सिंग - ४९ कि. ग्रा.
  २) शिव थापा - ५६ कि. ग्रा.
  ३) जय भगवान - ६० कि. ग्रा.
  ४) मनोज कुमार - ६४ कि. ग्रा.
  ५) विकास कृष्णन - ६९ कि. ग्रा.
  ६) विजेंदर सिंग - ७५ कि. ग्रा.
  ७) सुमित संगवान - ८१ कि. ग्रा.
  महिला :
  १) मेरी कोम : ५१ कि. ग्रा.

  जुडो :

  महिला :
  १) गरिमा चौधरी

  रोइंग :

  १) स्वर्ण सिंग विरक - सिंगल स्कल्स
  २) संदीप कुमार - लाईट वेट डबल स्कल्स
  ३) मनजित सिंग - लाईट वेट डबल स्कल्स

  शूटिंग :

  पुरुष :
  १) अभिनव बिन्द्रा - १० मीटर एईर रायफल
  २) जोयादीप करमकर - ५० मीटर रायफल प्रोन
  ३) विजय कुमार - २५ मीटर रापिड फायर पेस्तोल
  ४) गगन नारंग - १० मीटर एईर रायफल
  ५) संजीव राजपूत - ५० मीटर रायफल ३ पोझिशन
  ६) मानवजीत सिंग संधू - ट्राप
  ७) रोजन सोधी - डबल ट्राप
  महिला:
  १) शगुन चौधरी - डबल ट्राप
  २) राही सरनोबत - २५ मीटर पेस्तोल
  ३) हीना सिद्धू - २५ मीटर पेस्तोल
  ४) अनुराज सिंग - १० मीटर ऎर पेस्तोल

  स्विमिंग :

  १) आरोन डिसूझा - २०० मीटर फ्री स्टायल
  २) वीरधवल खाडे - १०० मीटर फ्री स्टायल, २०० मीटर फ्री स्टायल
  ३) सौरभ सांगवेकर - १५०० मीटर फ्री स्टायल
  ४) संदीप शेजवळ : १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक

  टेबल टेनिस :

  पुरुष:
  १) सौम्यजित घोष :
  महिला :
  १) अंकिता दास

  टेनिस :

  १) लेंडेर पेस + विष्णू वर्धन - पुरुष दुहेरी
  २) महेश भूपती + रोहन बोपण्णा - पुरुष दुहेरी

  वेट लिफ्टिंग :

  पुरुष :
  १) कुटुलू रवी कुमार - ६९ कि. ग्रा.
  महिला :
  २) सोन्निया चानू - ४८ कि. ग्रा.

  रेसलिंग :

  पुरुष :
  १) अमित कुमार - ५५ कि. ग्रा.
  २) योगेश्वर दत्त - ६० कि. ग्रा.
  ३) सुशील कुमार - ६६ कि. ग्रा.
  ४) नरसिंग पंचम यादव - ७४ कि. ग्रा.
  महिला :
  १) गीता पोघत - ५५ कि. ग्रा.

  या सर्व खेळाडूना सर्व भारतीयांकडून हार्दिक शुभेच्छा ...........तसेच अजून देखील बरेच खेळाडू लंडन ऑलिम्पिक मद्धे पात्र होण्या साठी प्रयत्न करीत आहेत. त्या सर्व खेळाडूना देखील सर्व भारतीयांकडून हार्दिक शुभेच्छा. खेळाडू जसजसे पात्र होत जातील, तशी त्यांच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला कळवत जाईन.

  या आपण हि सर्व माहिती आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करून या सर्व खेळाडूना प्रोत्साहित करूया. आणि हो, या सर्व खेळांडू बद्दल आणखीन माहिती, भूतकाळातील पर्फोर्मंस, इतर प्रतीस्पर्धाकांशी तुलना, ऑलिम्पिकमधील निकाल........... या सर्व मी आपणाशी शेअर करत राहीन. आपण सर्वांनी क्रिकेट सारखेच या सर्व खेळांकडे देखील लक्ष देवून खेळाडूना प्रोत्साहन द्यावे.

  धन्यवाद
 • #4208
  Dear Kamlesh,

  Will you post this entire article in English at resources section to get more points and cash credits. Yes you can use both Marathi and English language in resources section of Maharashtra Spider.

  With Best Regards,
  Vilas


 • This thread is locked for new responses. Please post your comments and questions as a separate thread.
  If required, refer to the URL of this page in your new post.