संगीताचा " स्वर" मुका झाला
आपल्या धीरगंभीर स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे स्वरभास्कर पंडित भीमसेन गुरुराज जोशी ज्यांनी शास्त्रोक्तपणा कायम ठेवत शास्त्रीय संगीताला लोकप्रिय करण्यात सिंहाचा वाटा उचलला, अशा या स्वरभास्कराच्या निधनाने देशातील संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. खरोखर भारतीय शास्त्रीय संगीतातील कोहिनूर हरपला. पंडितजींची उणीव भारतीय शास्त्रीय संगीताला नेहमीच जाणवत राहील. त्यांनी गायलेले अभंग आणि राग अजरामर राहतील.'अमृताचे होडी बुडविले तुम्ही
बुडताना आम्ही धन्य झालो
संपले झालो विश्वाकार
स्वरात ओंकार भेटला गा'
प्रत्यक्ष ईश्वरालाही वाटले कि आता या स्वरभास्कराचे गाणे त्याला स्वर्गात बोलावूनच ऐकावे....... आणि आपण पृथ्वीवासीय मात्र त्यांच्या स्वर्गीय सुरांना कायमचे पारखे झालो. आता राहिल्या त्या फक्त आठवणी आणि रेकोर्ड केलेले त्यांचे अजरामर स्वर. आपल्या कुटुंबातीलच कुणी व्यक्ती गमाविल्यचे दुखआज होतेय; अश्रू दाटून येतायत. ..! आणखी काय लिहू? हे ईश्वरा त्य्नाच्या आत्म्यास चीरशांती दे व आम्हा भारतीयांना असा दुसरा स्वरभास्कर लवकर दे.